नवी दिल्ली - आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी जीडीपीच्या सुधारित आर्थिक आकडेवारीबाबत संशय व्यक्त केला होता. ही आकडेवारी देणाऱ्या भारतीय सांख्यिकी व्यवस्थेत मोठे होणार बदल होणार आहे. त्याबाबतची माहिती खुद्द नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी रविवारी वृत्तसंस्थेला दिली.
भारतीय सांख्यिकी व्यवस्थेत होणार मोठे बदल, नीती आयोग घेणार जागतिक बँकेची मदत - वर्ल्ड बँक
भारतीय सांख्यिकी व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिकीकरणावर भर दिला जाणार असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले. त्यातून धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्यक्ष चालू स्थितीमधील (रिअल टाईम डाटा) आकडेवारी मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले.
भारतीय सांख्यिकी व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिकीकरणावर भर दिला जाणार असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले. त्यातून धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्यक्ष चालू स्थितीमधील (रिअल टाईम डाटा) आकडेवारी मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले. देशाच्या सांख्यिकी व्यववस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी जागतिक बँकेच्या संपर्कात असल्याची त्यांनी माहिती दिली. या व्यवस्थेचे आधुनिकीकरण हे जगातील सांख्यिकी व्यवस्थेशी संलग्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की जागतिक बँकेच्या पथकाने नुकताच माझी भेट घेतली. सांख्यिकी व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी काय पावले उचलावीत यासाठी ते सक्रियपणे काम करत आहेत.
चालू आर्थिक वर्षात सरकारचे ९० हजार कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट -
पंतप्रधान कार्यालयाने विविध सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक करण्याबाबत थिंक टँक असलेल्या नीती आयोगाकडे विचारणा केली आहे. यावर नीती आयोगाने ३४ आजारी असलेल्या सरकारी कंपन्या व एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्याची शिफारस पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने ९० हजार कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.