नवी दिल्ली- भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा मानही मिळविला आहे. एनडीए सरकारने आज केंद्रीय मंत्रिमंडळाचे वाटप जाहीर केले. यात निर्मला यांच्यावर अर्थमंत्रालय व कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्रीपदाची पूर्णवेळ जबाबदारी सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण पहिल्या महिल्या ठरल्या आहेत.
एनडीए बहुमतामध्ये सत्तेत आल्यानंतर माजी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्या चालू आर्थिक वर्षाचा जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
निर्मला सीतारमण यांच्या रुपाने देशाला मिळाल्या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री - Indira Gandhi
एनडीए बहुमतामध्ये सत्तेत आल्यानंतर माजी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्या चालू आर्थिक वर्षाचा जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सांभाळला होता अर्थमंत्रालयाचा कारभार-
मोरारजी देसाई यांनी १६ जुलै १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन इंदिरा गांधींनी ते पद सांभाळले होते. इंदिरांनी १९७०-७१ चा अर्थसंकल्प सादर केला होता. इंदिरा गांधींनीदेखील केंद्रीय संरक्षणमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. मात्र त्या पूर्णवेळ संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत नव्हत्या.
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रभारी केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला होता.