लंडन - भारतात बँकांची फसवणूक करून पळून गेलेला नीरव मोदी पुन्हा एकदा इंग्लंडच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहे. यापूर्वी न्यायालयाने दोनवेळा त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
नीरव मोदीची जामिनसाठी धडपड, इंग्लंडच्या न्यायालयात नव्याने दाखल करणार अर्ज - UK court
नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा अर्बुथनॉट या तिसऱ्यांदा लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात निरव मोदीच्या जामिनाची सुनावणी घेणार आहेत. मोदी हा सुनावणीसाठी प्रत्यक्ष की व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित राहणार आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बॅरिस्टर क्लेअर माँटगोमेरी या नीरव मोदीची न्यायालयात बाजू मांडणार आहेत. यापूर्वी २६ एप्रिल व्हिडिओ लिंकद्वारे नीरव मोदीच्या खटल्याप्रकरणी सुनावणी झाली होती. त्याला २४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मोदीवर गुन्हा नोंदवून मार्च २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी आहे.