नवी दिल्ली - फास्टॅग वॉलेटवर किमान रकमेची अट काढून टाकण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) घेतला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना अनामत रकमेशिवाय फास्टॅगचा वापर करणे शक्य होणार आहे.
टोलनाक्यावर फास्टॅगचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमानुसार चारचाकी वाहन चालकांना फास्टॅगच्या वॉलेटवर सुरक्षित रक्कम ठेवावी लागते. सुरक्षित रकमेची अट असल्याने टोलचे शुल्क वॉलेटवर असूनही अनेक वाहन चालकांना फास्टॅगचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा आणि वाहतुकीत अडथळे येण्याचे प्रकार घडत होते.
हेही वाचा-'नवीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरता सरकार वचनबद्ध'
टोलनाक्यावर फास्टॅगचा वापर वाढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग वॉलेटवरील किमान रकमेच्या नियमाची अट शिथील केली आहे. जर वॉलेटवरील रक्कम शून्याहून कमी नसेल तर वाहन चालकांना फास्टॅगच्या मार्गिकेमधून जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही. जर फास्टॅगवरील रक्कम शून्याहून कमी झाल्यास संबंधित बँकेला ग्राहकाकडून सुरक्षित रकम घेता येणार आहे. देशात फास्टॅगचे २.५४ कोटीहून अधिक
हेही वाचा-बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीचा छापा
काय आहे फास्टॅग-
फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.
सध्या फास्टॅग नसतानाही त्यासाठी असलेल्या रांगेमधून वाहने जात असतात. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची अनेकदा गर्दी होत असते. अद्याप, फास्टॅगचा वापर वाढलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर फास्टॅगचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय सरकारने घेतला आहे.