महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

..तर तुमचे डेबिटसह क्रेडिट कार्ड बंद होणार - क्रेडिट कार्ड

ग्राहकांना एटीएम कार्ड हे केवळ देशात वापरण्यासाठी परवानगी द्यावी, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना निर्देश दिले आहेत. ग्राहकाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी बँकेकडे स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. यापूर्वी बँकांकडून कार्ड खरेदी केल्यानंतर या सेवा देण्यात येत होत्या.

डेबिट अर्थवा क्रेडिट कार्ड
संग्रहित

By

Published : Mar 16, 2020, 2:58 PM IST

नवी दिल्ली-ग्राहकांच्या बँक खात्याची सुरक्षितता लक्षात घेवून भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट आणि डेबिट कार्डासाठी आजपासून नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे ज्या कार्डचा वापर झाला नाही ते डेबिट व क्रेडिट कार्ड आजपासून बंद होणार आहेत.

ग्राहकांना एटीएम कार्ड हे केवळ देशात वापरण्यासाठी परवानगी द्यावी, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना निर्देश दिले आहेत. ग्राहकाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी बँकेकडे स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. यापूर्वी बँकांकडून कार्ड खरेदी केल्यानंतर या सेवा देण्यात येत होत्या.

हेही वाचा-महामारीचा आर्थिक फटका : गुंतवणूकदारांनी गमाविले ६.२५ लाख कोटी!

मोबाईल बँकिंग, नेट बँकिंगसाठी वेळेची मर्यादा घालण्याचा ग्राहकाला पर्याय द्यावा, असे आरबीआयने निर्देशात म्हटले आहे. जर त्यामध्ये कोणताही बदल झाला तर बँकेकडून ग्राहकाला सावधानतेचा एसएमएस पाठविला जाणार आहे. तसेच कार्ड हवे तेव्हा चालू किंवा बंद करण्याचा पर्याच ग्राहकांना द्यावा लागणार आहे. मात्र, ही तरतूद प्रिपेड गिफ्ट कार्डसाठी नसणार आहे.

हेही वाचा-येस बँकेच्या कामकाजाची गाडी बुधवारपासून येणार रुळावर

अनेकदा सायबर गुन्हेगार ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरबीआयने हे नवे नियम लागू केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details