महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पीएमसी घोटाळा; मुंबई पोलिसांकडून न्यायालयात स्वतंत्र आरोपपत्र दाखल - पीएमसी

आर्थिक अनियमितता असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर सप्टेंबरमध्ये निर्बंध लागू केले आहेत. आरबीआयच्या आदेशामुळे पीएमसी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत.

PMC bank
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक

By

Published : Dec 27, 2019, 3:59 PM IST

मुंबई- पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज मुंबई जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी न्यायालयाच्या आवारात दुपारी दिसून आले.

आर्थिक अनियमितता असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर सप्टेंबरमध्ये निर्बंध लागू केले आहेत. आरबीआयच्या आदेशामुळे बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. सुरुवातीला बँकेच्या खातेदारांना केवळ १ हजार रुपये खात्यामधून काढता येत होते. त्यामध्ये हळहळू वाढ करून ही मर्यादा सध्या ५० हजार रुपये आहे.
यापूर्वी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने पीएमसी घोटाळ्याप्रकरणी स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा-'ठेवीदारांच्या हिताकरता एचडीआयएलसह वाधवानची मालमत्ता विकावी'

बँकेत ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा -

आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल ग्रुपचे राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांना पीएमसीमधील घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच बँकेचा माजी चेअरमन वारयम सिंग व बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक हेदेखील अटकेत आहेत. पीएमसीमध्ये सुमारे ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा झाला आहे.

हेही वाचा-पीएमसी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिन करणार - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details