नवी दिल्ली- आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारी एमटीएनएल कंपनीचा तिढा अजूनही सुटला नाही. कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन थकवले आहेत. त्याचा निषेध करत सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांनी थेट दूरसंचार मंत्रालयासमोर सोमवारी आंदोलन केले.
स्वेच्छा निवृत्ती योजना राबविण्यापूर्वी सरकारने थकित वेतन द्यावे, अशी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. एमटीएनएल एक्झ्युटीव्ह असोसिएशनचे महासचिव व्ही.के. तोमर म्हणाले, सरकारचा उद्देश आणि व्यवस्थापन योग्य नाही. वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार न देऊन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य कमी करण्यात येत आहे. एमटीएनएलच्या फेब्रुवारीपासून उशिरा पगार होत आहेत. अद्याप, जून आणि जुलैचा पगार मिळालेल्या नाहीत.