भोपाळ - मध्यप्रदेश सरकारने नागरिकांना रेशन दुकानांमधून मास्क देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकार कॉटनचे ५० लाख मास्क खरेदी करणार आहे. शहरी भागातील महिलांनी तयार केलेले मास्क सरकार खरेदी करणार असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मास्क खरेदी करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला आहे. सरकारने खरेदी केलेले मास्क हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. मास्कच्या निर्मितीमधून महिलांना रोजगार मिळणार असल्याचेही जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.