महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारत उत्पादनाचे जागतिक हब होण्याकरता उर्जा मंत्रालयाने 'हा' घेतला निर्णय - नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

कोरोनाच्या संकटानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून उत्पादन प्रकल्प हलविण्यावर विचार करत आहेत. अशावेळी केंद्र सरकारने विदेशातील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी उर्जा प्रकल्पावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

उर्जा मंत्रालय
उर्जा मंत्रालय

By

Published : Apr 18, 2020, 12:32 PM IST

नवी दिल्ली - भारत हा जागतिक उत्पादनांचे हब करण्यासाठी व देशातील उर्जेची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) सर्व राज्यांना नवीकरणीय उर्जेच्या निर्मितीसाठी पार्क उभारण्याची सूचना केली आहे. असे पार्क उभारणाऱ्या राज्यांना केंद्र सरकार मोठ्या सवलती देणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून उत्पादन प्रकल्प हलविण्यावर विचार करत आहेत. अशावेळी केंद्र सरकारने विदेशातील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी उर्जा प्रकल्पावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-टीव्हीएस मोटर कंपनीने इंग्लंडमधील 'या' दुचाकी कंपनीची घेतली मालकी

नवीकरणीय उर्जाची साधने तयार करण्यासाठी नवीन हब स्थापन करण्यात येणार आहेत. उर्जा मंत्रालयाने विविध राज्यांसह बंदरांच्या प्रशासनाला संपर्क करून ५० ते ५०० एकरांची जागा उर्जा पार्कसाठी निश्चित करण्यास सांगितले. टुटीकोरिन पोर्ट ट्रस्ट, मध्यप्रदेश आणि ओडिसाने असे पार्क सुरू करण्यासाठी तयारी दाखविली आहे. गेल्या आठवड्यात एमएनआरईचे सचिव आनंद कुमार यांनी विविध नवीकरणीय कंपन्यांची बैठक घेतली होती. मंत्रालयाने विदेशी व्यापार प्रतिनिधी आणि कंपन्यांच्या संपर्कात आहे. त्यांना देशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा-जिओची ऑफर : दुसऱ्यांचे मोबाईल रिचार्ज करा अन् कमिशन मिळवा

ABOUT THE AUTHOR

...view details