महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'आयात केलेला कांदा जानेवारीमध्ये देशात पोहोचणे अपेक्षित' - केंद्रीय अन्न आणि धान्य वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे

उशिरा आलेला  आणि लांबलेला पाऊस या दोन कारणांनी कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे केंद्रीय अन्न आणि धान्य वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार राखीव असलेल्या कांद्याचा साठा वितरित करत आहे.

onion Market
संग्रहित - कांदा बाजारपेठ

By

Published : Dec 6, 2019, 6:59 PM IST

नवी दिल्ली- कांद्याच्या वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी कंपनी एमएमटीसीकडून कांद्याची आयात करण्यात येत आहे. हा आयातीचा कांदा जानेवारीत देशात पोहोचेल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यसभेत सांगितले.

उशीरा आलेला आणि लांबलेला पाऊस या दोन कारणांनी कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे केंद्रीय अन्न आणि धान्य वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार राखीव असलेल्या कांद्याचा साठा वितरित करत आहे. एमएमटी विविध देशांमधून कांदा आयात करत आहे. हा कांदा जानेवारीमध्ये देशामध्ये पोहोचणे अपेक्षित आहे.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात ३३४ अंशाची घसरण; बँकासह ऑटो कंपन्यांना फटका

खाद्यतेलाच्या उत्पादनाबाबत बोलताना दानवे म्हणाले, देशामधील उत्पादन ही मागणी पूर्ण करण्याएवढे पुरेसे नाही. खाद्यतेलाची मागणी व उत्पादनात तफावत असल्याने ही गरज आयातीमधून पूर्ण केली जाते. वर्ष २०१९-२० मध्ये महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन हे ४२.०८ लाख टन होणे अपेक्षित आहे. गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन हे ४२.०८ लाख टन एवढे झाले होते. गेल्या पाच वर्षात सोयाबीनचे उत्पादन हे ३४.७७ लाख मेट्रिक टन एवढे होते.

हेही वाचा-'या' क्षेत्रात १ लाख हंगामी कर्मचाऱ्यांनी गमाविल्या नोकऱ्या

खाद्यतेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने विविध पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यतेलाच्या मागणीपैकी ६० टक्के गरज ही आयातीमधून पूर्ण केली जाते. तर ४० टक्के खाद्यतेलाची गरज ही देशातील उत्पादनामधून पूर्ण केली जाते. किमान आधारभूत वाढविण्यात आल्याचेही दानवेंनी सांगितले.

दिल्लीमध्ये कांद्याचा भाव गुरुवारी प्रति किलो १०९ रुपयावर पोहोचला. देशभरात कांद्याचे भाव वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी संसदेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details