मुंबई - शहर विकास प्राधिकरण संस्था (एमएमआरडीए) राज्यातील महानगरांमध्ये हजारो कोटींचे पायाभूत प्रकल्प विकसित करत आहे. त्यामध्ये १ लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या संधी असल्याचे एमएमआरडीएचे आर.ए.राजीव यांनी सांगितले. ते फिलिप कॅपिटलने आयोजित केलेल्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात बोलत होते.
एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी १६ जागतिक आणि देशातील वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यामध्ये गोल्डमॅन सॅच्स, रिलायन्स, अवेन्डूस कॅपिटल आणि टाटा एआयए लाईफचा समावेश आहे. पायाभूत प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी एमएमआरडीएने देशातील व विदेशातील गुंतवणुकदारांना आमंत्रित केले आहे.
हेही वाचा-शाओमीचा ५ हजार एमएएच बॅटरी क्षमतेचा रेडमी ८ ए लाँच; जाणून घ्या, स्मार्टफोनची किंमत
राजीव म्हणाले, आम्ही मुंबईसह महानगर भागात विकास करण्याच्या टप्प्यावर आहोत. मेट्रो कॉरिडॉरसह अनेक पायाभूत प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. एमएमआरडीएने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, बहुस्तरीय कॉरिडॉर, बहुस्तरीय १४ लाईनचे ३३७ किमीचे मेट्रो नेटवर्क आदी कामे हाती घेतली आहेत. एमएमआरडीए प्रकल्पांना जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडून निधी देण्यात आलेला आहे.