महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

झोमॅटोचा IPO मिळाला नसेल तर चिंता नको, आणखी बंपर आयपीओ येणार... - LIC and Paytm IPO

आयपीओ म्हणजे काय? याची तुम्हाला माहिती हवी आहे? झोमॅटोच्या आयपीओनंतर बाजारानंतर आणखी आयपीओ येणार आहेत. तुम्हाला याची माहिती देणारी ही स्पेशल स्टोरी.

शेअर बाजार आयपीओ
शेअर बाजार आयपीओ

By

Published : Jul 28, 2021, 8:08 PM IST

हैदराबाद - कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. असे असले तरी अनेकजण आयपीओच्या खरेदीमुळे तेजीचा अनुभव घेत आहे. काहीजणांना आयपीओची माहिती नाही. तर चला आयपीओची माहिती घेऊ. तुम्हीही यामध्ये गुंतवणूक करून नफा मिळवू शकता.

काय आहे आयपीओ?

पैसे जमविण्यासाठी कंपन्या आयपीओ म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) शेअर बाजारात आणत असतात. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या गुंतवणूकदार संस्थांना तसेच सर्वसामान्य गुंतवणुकादारांना शेअर खऱेदीची संधी देतात. आयपीओ बाजारात आणण्यापूर्वी कंपन्यांना सेबीची परवानगी घ्यावी लागते. आयपीओ म्हणजे थोडक्यात शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी कंपनीने शेअरची जाहीर केलेली किमान किंमत असते.

आयपीओ

हेही वाचा-अल्पवयीन न्याय सुधारणा कायदा विना चर्चा, गोंधळात राज्यसभेत मंजूर, एक दिवस कामकाज स्थगित

आयपीओवर सेबीची असते नजर

सेबीकडून (Securities and Exchange Board of India) आआयपीओ आणणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण असते. कंपन्यांना प्रत्येक आर्थिक निर्णयाची व ताळेबंदाची माहिती सेबीला द्यावी लागते. आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांतून कंपन्यांकडून विस्तार, तंत्रज्ञान विकास आणि नवीन मालमत्ता घेण्यासह कर्ज फेडण्यासाठी केला जातो.

आयपीओमध्ये कोण करू शकते गुंतवणूक?

आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी किमान 18 वर्षे वयाची अट आहे. तसेच पॅन कार्ड आणि डीमॅट अकाउंट असणे बंधनकारक आहे. कंपनीकडून कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 10 दिवस आयपीओ खुला राहतो. या कालावधीत तुम्ही आयपीओ खरेदी करू शकता. ही खरेदी कंपनीची वेबसाईट किंवा अधिकृत ब्रोकरकडून आयपीओमध्ये गुंतवणूक करणे शक्य आहे.

हेही वाचा-ममता बॅनर्जी सोनिया गांधींना भेटल्या; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी

अशी आहे आयपीओमधील वर्गवारी

कंपनीकडून आयपीओची तीन गटांमध्ये वर्गवारी करता येते. 2 लाखांपर्यंत गुंतवणूक ही किरकोळ गुंतवणूकदारांना (रिटेल इनव्हेस्टर) करता येते. तर 2 लाखांहून अधिक गुंतवणूक करणारे हे बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) असतात. तर पात्र संस्थात्मक गुंतवणुकदारांमध्ये (QIB) पेन्शन फंड, म्यूचअल फंड, बँक आणि विमा कंपनीचा समावेश होते. तीनही गटांमध्ये किती शेअर असणार आहेत, याची कंपनीकडून माहिती जाहीर केली जाते. कंपनीच्या शेअरची किंमत निश्चित करताना लॉटचा आकार निश्चित करण्यात येतो. लॉटमधील शेअरची किंमत कमीत कमी 15 हजार रुपये असते. त्यामुळे आयपीओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी 15 हजार रुपये आवश्यक असतात. तर आयपीओ खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये आवश्यक असतात.

हेही वाचा-नवीन आयटी कायद्याची अंमलबजावणी करा, दिल्ली उच्च न्यायालयाची ट्विटरला अखेरची संधी

आयपीओची किंमत आणि त्याचे वाटप

आयपीओची किंमत ही प्रमोटर्स, शेअरहोल्डर यांच्या विचारानुसार निश्चित केली जाते. आयपीओच्या माध्यमातून कंपनी बाजारातील प्रतिष्ठा जाणून घेते. जर आयपीओची मागणी वाढली तर शेअचरी किंमत वाढते. त्यामुळे गुंतवणुकदारांचा अधिक फायदा होतो.

आयपीओ खुला होण्याची कालावधी संपताच आयपीओ गुंतवणुकदारांना दिला जातो. अनेकदा लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना आयपीओ दिला जातो. आयपी गुंतवणूकदारांना दिल्यानंतर कंपनीची शेअर बाजारात सूचीबद्ध होते. शेअर बाजारात कंपनीची नोंदणी झाल्यानंतर ग्राहक कंपनीचे शेअर खरेदी व विक्री करू शकते.

हे येणार आयपीओ

बाजारात आयपीओ आहेत तेजीत...

शेअर बाजारात कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. चालू वर्षात जुलैपर्यंत 29 कंपन्यांनी आयपीओ बाजारात आणले आहेत. त्यामधून कंपन्यांनी 40 हजार कोटी रुपये जमविले आहेत. तर जुलै महिनाअखेर 6 आयपीओमधून कंपन्यांनी 15 हजार कोटी रुपये जमविले आहेत. 2017 मध्ये कंपन्यांनी आयपीओमधून 67 हजार कोटी रुपये जमविले आहेत. गुंतवणुकदारांचा प्रतिसाद पाहता कंपन्यांकडून शेअर बाजारात आयपीओ आणले जात आहेत. विशेषत: झोमॅटोच्या आयपीओला प्रतिसाद मिळाल्यानंतर बाजारातील चित्र बदलले आहे. 2017 मधील आयपीओचा विक्रम यंदा सहजरित्या ओलांडू शकतो.

झोमॅटो

पेटीएमदेखील बाजारात आणणार आयपीओ

पेटीएम ही भारतीय स्टार्टअप कंपनी आहे. मात्र, थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमांमुळे कंपनीवर विदेशी कंपनीचे नियंत्रण आहे. कंपनीत चीनच्या एंट ग्रुपची सर्वाधिक 30.33 टक्के गुंतवणूक आहे. त्याचबरोबर जपानची सॉफ्ट बँकेची 18.73 टक्के, एलिव्हेशन कॅपिटलची 17.65 टक्के, अलीबाबाची 7.32 टक्के, विजय शेखर यांची 14.97 टक्के तर अन्य 11 टक्के अशी पेटीएम कंपनीत गुंतवणूक आहे. पेटीएम कंपनी एकूण 16,600 कोटी रुपयांचे शेअर बाजारात आणणार आहे. त्यामधील 8,300 कोटी रुपये आयपीओमधून जमा करणार आहे. उद्योगपती रतन टाटा ते वॉरेन बॅफेट यांनी पेटीएममध्ये गुंतवणूक केली आहे.

पेटीएम

एलआयसी बाजारात आणणार आयपीओ

पेटीएमदेखील आयपीओ आणणार आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीदेखील आयपीओ बाजारात आणणार आहे. एलआयसीने आयपीओमधून 90 हजार कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापूर्वी कोल इंडियाने 2010 मध्ये आयपीओमधून 15,200 रुपये मिळविले होते.

एलआयसी

शेअर बाजारात विचारपूर्वक करावी गुंतवणूक

शेअर बाजारात नुकसान होण्याची भीतीने अनेकजण गुंतवणूक करण्याचे टाळतात. मात्र, थोडी माहिती आणि बाजाराचे ज्ञान असेल तर फायदा मिळू शकतो. या लेखामागे आयपीओची माहिती देणे हा उद्देश आहे. चालू वर्षात बाजारात अनेक कंपन्या आयपीओ आणणार आहेत. त्याचा गुंतवणुकदारांना फायदा मिळू शकतो. मात्र, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची जोखीम आणि गुंतवणूकदारांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

ABOUT THE AUTHOR

...view details