महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गरिबांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डाळींचे होणार वाटप

देशातील २० कोटी कुटुंबांना १ किलो डाळीचे वाटप तीन महिने करण्यात येणार आहे. डाळीचे वाटप आणि वितरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्ववजनिक मंत्रालयाने म्हटले आहे.

डाळ
डाळ

By

Published : Apr 26, 2020, 9:59 AM IST

नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरिबांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमधून मेच्या महिल्या आठवड्यात डाळींचे मोफत वाटप होणार आहे. देशात ५.८८ लाख टन डाळीचा गरिबांना पुरवठा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्ववजनिक मंत्रालयाने दिली आहे.

देशातील २० कोटी कुटुंबांना १ किलो डाळीचे वाटप तीन महिने करण्यात येणार आहे. डाळीचे वाटप आणि वितरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्ववजनिक मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-सुंदर पिचाई यांना वेतनांसह मिळणारे भत्ते जगात सर्वाधिक; आकडा ऐकून व्हाल थक्क

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नाफेडने डाळींचा पुरेसा साठा करून ठेवला आहे. प्रक्रिया केलेल्या डाळी पहिल्यांदा राज्यांच्या गोडावूनमध्ये पोहोचविल्या जाणार आहेत. त्यानंतर त्याचे रेशन दुकानांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. नाफेडने डाळ प्रक्रिया करण्यासाठी उद्योगांची ऑनलाईन लिलावाद्वारे निवड केली आहे. या उद्योगांना डाळींची स्वच्छता, पॅकेजिंग आणि वाहतूक करावी लागणार आहे. प्रत्येक पोत्यात ५० किलोची डाळ असणार आहे.

हेही वाचा-टाळेबंदीत अक्षय तृतीया: ऑनलाईन विक्रीतूनच सराफ साधणार 'मुहूर्त'

ज्या राज्यात डाळींचे उत्पादन होते, तिथे स्थानिक डाळ उद्योगांकडून खरेदी होणार आहे. या डाळींच्या वितरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details