महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'चीनमधील अनेक कंपन्या इतर देशांमध्ये प्रकल्प हलवत आहेत'

केनेची आयुकावा यांची नुकतेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सच्या (एसआयएएम) अध्यक्षपदी निवड झाली आहे. जपानमधील उत्पादक कंपन्यांनी भारतात विस्तार आणि उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केनेची यांनी सांगितले.

मारुती सुझुकी
मारुती सुझुकी

By

Published : Sep 5, 2020, 6:38 PM IST

नवी दिल्ली- चीनमधील अनेक कंपन्यांना त्यांचे उत्पादन प्रकल्प हे भूराजकीय जोखीममुळे इतर देशात हलवत आहेत. ऑटो आणि सुट्ट्या भागांच्या उत्पादकांनीही अशी गुंतवणूक देशात आणणे आवश्यक असल्याचे मत मारुती सुझुकीचे सीईओ केनेची आयुकावा यांनी व्यक्त केले. ते एसआयएएमच्या वार्षिक ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.

केनेची आयुकावा यांची नुकतेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सच्या (एसआयएएम) अध्यक्षपदी निवड झाली आहे. जपानमधील उत्पादक कंपन्यांनी भारतात विस्तार आणि उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केनेची यांनी सांगितले. अशी पावले दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युरोपिन देशांमध्ये उचलण्यात आली आहेत. सुट्ट्या भागांच्या उत्पादकांना जास्तीत सुट्टे भाग स्थानिक भागात उत्पादिक करावेत. तसेच कच्चा माल हा आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत देशातून घ्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-उद्योगानुकूलतेच्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचा पुन्हा पहिला

सध्याची कठीण परिस्थिती ही मोठी संधी आहे. चीनमधील अनेक कंपन्यांची देशामध्ये गुंतवणूक आणावी. त्यांनी देशात उत्पादन घेण्यासाठी त्यांच्याशी करार करावेत, अशी अपेक्षा मारुती सुझकीच्या सीईओंनी व्यक्त केली. वाहनांच्या सुट्ट्या भागांच्या उत्पादकांनी आव्हानात्मक परिस्थितीत उत्पादन वाढविण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असा केनेची यांनी वाहन उत्पादकांना सल्ला दिला.

हेही वाचा-घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे मुद्रांक शुल्क माफ; बिल्डरांची संघटना नरेडेकोची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details