मनमाड (नाशिक) - बाजार समित्या 15 दिवसांनंतर सुरू झाल्या आहेत. कांद्याचे आवक चांगली राहिल्याने बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. बाजार समितीचा पहिला दिवस असूनही केवळ 250 जणांना प्रवेश दिल्याने गर्दी कमी प्रमाणात झाली.
बाजार समितीत येताना सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांनी स्वतःच कोव्हिड टेस्ट करून रिपोर्ट सोबत आणले होते. ज्यांनी कोव्हिड रिपोर्ट आणले नाही, त्यांच्या टेस्ट बाजार समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 15 दिवसापासून बंद असलेल्या बाजार समित्या आजपासून सुरू झाल्या आहेत. बाजार समिती उघडण्याचा पहिलाच दिवस असल्याने गर्दी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, बाजार समितीच्यावतीने केवळ 250 लोकांनाच प्रवेश दिल्याने गर्दी टळली आहे. तर कोव्हिडची टेस्ट असल्याशिवाय प्रवेश नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आधीच कोव्हिड टेस्ट करून सर्टिफिकेट सोबत आणले होते. तर उर्वरित शेतकऱ्यांची टेस्ट बाजार समितीच्यावतीने करण्यात आली होती.
हेही वाचा-पंतजली डेअरीचे सीईओ सुनिल बन्सल यांचा कोरोनाने मृत्यू
बाजार समित्या बंद न करता कडक निर्बंध लावून सुरूच ठेवाव्यात
कांद्याला प्रति क्विटंल सरासरी 1300 च्या आसपास दर होता. तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना इतर ठिकाणांप्रमाणे तापमान चेक करून प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जेणेकरून कोव्हिड टेस्टसाठी लागणारा आर्थिक भुर्दंड कमी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बाजार समित्या बंद न करता कडक निर्बंध लावून सुरूच ठेवाव्यात, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
2 सत्रात लिलाव सुरू
सकाळी व दुपारी अशा 2 सत्रात बाजार समित्या सुरू केल्या आहे. आज सकाळी 250 व दुपारच्या सत्रात 250 असे लिलाव सुरू करण्यात आले. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास सोपे जाईल, असे बाजार समितीचे म्हणणे आहे.
कांद्याचे भाव स्थिर...!
गेल्या 15 दिवसापासून बंद असलेल्या बाजार समित्या आजपासून सुरू झाले. आज आवक मोठया प्रमाणात होईल असे वाटले होते. मात्र आवक चांगली आल्याने कांद्याचे भाव स्थिर होते. कांद्याला प्रति क्विटंल सरासरी 1300 च्या आसपास दर होता. तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला आहे.