बंगळुरू- कोरोनाचा प्रसार वाढत असताना अनेकांना नियमितपणे कामावर जाण्याची धास्ती वाटू लागली आहे. अशावेळी फ्लिपकार्टने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना विलिनीकरण कक्षात ठेवावे लागले तर त्यांना कंपनी पूर्ण वेतन देणार आहे.
इन्फ्रारेड थर्मोमीटरचा वापर करून सर्व कर्मचाऱ्यांच्या तापमानाची तपासणी करण्यात येत असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. अशी तपासणी सर्व कर्मचारी, पुरवठादार आणि अभ्यागतांना बंधनकारक करण्यात आली आहे. तर फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या संशयितांना घरी जाण्याचा सल्ला फ्लिपकार्टकडून देण्यात येत आहे.