महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'ही' कंपनी चीनमधून भारतात हलविणार कारखाना; ८०० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा - विदेशी गुंतवणूक

लावा कंपनी येत्या ५ वर्षात भारतात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमध्ये मोबाईलच्या निर्मितीसह उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा समावेश आहे.

लावा कंपनी
लावा कंपनी

By

Published : May 16, 2020, 9:59 AM IST

Updated : May 16, 2020, 10:38 AM IST

नवी दिल्ली - मोबाईल तयार करणाऱ्या लाव्हा कंपनीने चीनमधून भारतात उत्पादन प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने मोबाईल कंपन्यांसाठी सवलती जाहीर केल्यानंतर लावाने हा निर्णय घेतला आहे.

लावा कंपनी येत्या ५ वर्षात भारतात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमध्ये मोबाईलच्या निर्मितीसह उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा समावेश आहे. लावा इंटरनॅशनलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय म्हणाले, की चीनमध्ये कंपनीचे सुमारे ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. देशातील मोबाईल विक्रीची गरज स्थानिक उत्पादन प्रकल्पामधून पूर्ण केली जाते.

हेही वाचा-पशुसंवर्धन विकासाच्या पायाभूत सुविधांकरता केंद्र सरकार देणार १५ हजार कोटी

अंशत: चीनमधून उर्वरित जगात मोबाईलची निर्यात करण्यात येत होती. सध्या, भारतामधून जगभरात मोबाईलची निर्यात होत आहे. टाळेबंदीत कंपनीने चीनमधून मोबाईलची निर्यात केली आहे. पुढे ते म्हणाले, की चीनमध्ये मोबाईल निर्यात करण्याचे माझे स्वप्न आहे. दरम्यान, केंद्र सरकारने स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना चालना मिळण्यासाठी ४८ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यामधून देशात थेट २० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकऱ्या २०२५ पर्यंत पूर्ण होतील, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.

हेही वाचा-जाणून घ्या; जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यातील बदलाने काय होणार?

Last Updated : May 16, 2020, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details