नवी दिल्ली - स्मार्टफोन बनवणाऱ्या भारतीय कंपनी 'लाव्हा'ने आपला फीचर फोन 'लाव्हा पल्स 1' उघडला आहे. या हँडसेटचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कॉन्टॅक्टलेस थर्मामीटरचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने कोणालाही स्पर्श न करता त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजता येऊ शकते. या फोनची किंमत फक्त 1 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, की शरीराचे तापमान मोजण्यासाठी तुम्हाला 'लाव्हा पल्स १' मध्ये सेन्सरपासून काही अंतरावर आपले डोके किंवा हात हलवावे लागेल आणि काही सेकंदात निकाल तुमच्यासमोर येईल. फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात 10 तापमानांचे रीडिंग सेव्ह करता येते आणि मेसेद्वारे हा निकाल इतरांनाही शेअर करता येऊ शकते.
हेही वाचा -5 कोटी स्मार्टफोन विक्रीसह रियलमी हा उदयोन्मुख ब्रँड : अहवाल
'लाव्हा पल्स १ हा एक चांगला पर्याय आहे. ज्यांना जास्त किमतीचे कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर खरेदी करता येत नाहीत किंवा ज्यांना डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी हा एक उपाय आहे,' असे लाव्हा इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट हेड तेजिंदर सिंग म्हणाले.
हा हँडसेट लष्करी-ग्रेड प्रमाणित आहे. यात 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मजबूत पॉली कार्बोनेट शीटचा बनलेला आहे. यामध्ये समाविष्ट केलेली इतर वैशिष्ट्ये फ्लॅशलाइट, व्हीजीए कॅमेरा आणि 32 जीबी पर्यंत एक्स्पान्डेबल मेमरी आहेत.
याशिवाय, कॉन्टॅक्ट्स सेव्ह करण्यासाठी फोटो आयकॉन, रेकॉर्डिंग, वायरलेस एफएम, ड्युअल सिम सपोर्टची सुविधादेखील आहे. तसेच, ऑटो कॉल रेकॉर्डिंगसह टायपिंगसाठी सात भाषांची सुविधा या फोनमध्ये उपलब्ध आहे.
हेही वाचा -ह्युंदाई मोटर इंडिया 5 नोव्हेंबरला लाँच करणार 'ऑल-न्यू आय 20'