महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कौतुकास्पद! कोरोनाच्या संकटात एअर इंडियाची 'अशी' आहे कामगिरी - KrishiUdan

एअर इंडियाने कृषी उडाण योजनेंतर्गत जगभरातील १० कार्गो केंद्र निश्चित केली आहेत. अशा ठिकाणी एअर इंडिया फळे, पालेभाज्या आणि वैद्यकीय साधने पोहोचवित आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया

By

Published : Apr 17, 2020, 3:56 PM IST

नवी दिल्ली- विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी काम करणाऱ्या एअर इंडियाने नवीन 'कृषी उडाण' मोहीम सुरू केली आहे. एअर इंडिया जीवनावश्यक असलेला कृषी माल आणि वैद्यकीय साधने विमानांमधून जागतिक बाजारपेठेत पोहोचवित आहे.

एअर इंडियाने 'कृषी उडाण' योजनेंतर्गत जगभरातील १० कार्गो केंद्र निश्चित केली आहेत. अशा ठिकाणी एअर इंडिया फळे, पालेभाज्या आणि वैद्यकीय साधने पोहोचवित आहे. एअर इंडियाने ही सेवा इंग्लंड, जर्मनी, इस्त्राईल, चीन, मॉरिशियस, श्रीलंका आणि मालदीवमध्ये दिली आहे. कोरोनाच्या संकटापूर्वी एअर इंडियाकडून देशात ५८ व विदेशात २९ ठिकाणी मालवाहू विमानांमधून वाहतूक करण्यात येत होती.

हेही वाचा-बँकांना मोठा दिलासा; एलसीआरचे प्रमाण १०० टक्क्यांवरून ८० टक्के करण्याचा निर्णय

अनेक वर्षांपासून एअर इंडियाकडून फळे, मांस, मासे, लसी, वर्तमानपत्र अशा गोष्टींची वाहतूक करण्यात येते. या योजनेतंर्गत एअर इंडिया विदेशातून इतर साधनसामुग्री देशामध्ये आणत आहे. विदेशात अडकलेले सुमारे २ हजार नागरिक व यात्रेकरून एअर इंडियाने मायदेशात आणले आहे. देशामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये विमांनातून मालवाहतूक करत आहेत. याशिवाय ईशान्या भारतामधील काही ठिकाणांसह दुर्गम भागातही एअर इंडिया वैद्यकीय साधनांसह जीवनावश्यक वस्तुंची मालवाहतूक करत आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा : एल अँड टी देणार सरकारला ४० कोटींची वैद्यकीय साधने

दरम्यान, केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीसाठी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गुंतवणूकदारांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने एअर इंडियाचे खासगीकरण बारगळले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details