नवी दिल्ली - स्थावर मालमत्ता क्षेत्रात मंदीचे चित्र आहे. अशा स्थितीमध्ये प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनी जेएलएल इंडियाच्या उलाढालीत १७ टक्क्याने वाढ होवून ४ हजार कोटीपर्यंत पोहोचली आहे. ही कंपनी पुढील वर्षापर्यंत २ हजार जणांना नोकऱ्या देणार आहे.
जेएलएल इंडियामध्ये ११ हजार ५०० लोक कार्यरत आहेत. तर कपंनीचे देशातील १० मोठ्या शहरात कार्यालये आहेत. जेएलएल इंडियाचे प्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर म्हणाले, 'भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रामधील जागांची विशेषत: कार्यालयाच्या जागांची मागणी वाढली आहे. ही मागणी गुंतवणूकदार आणि वापरकर्ते या दोन्हींकडून वाढली आहे. त्यामुळे कंपनीच्या उलाढालीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.'