नवी दिल्ली- सर्वच वस्तूव व सेवांचे दर वाढत असताना मोबाईलर बोलणे आणि इंटरनेटचा वापर करणेही महागणार आहे. दूरसंचार क्षेत्राच्या बाजारपेठेत वर्चस्व असलेल्या जिओने मोबाईल कॉलिंगसह डाटाचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज जाहीर केला. ग्राहकांसाठी नवीन वाढलेले दर हे ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने दर वाढीने ग्राहकांना ३०० पटीने फायदा होणार असल्याचे सांगितले. नव्या प्लॅनमध्ये दुसऱ्या दूरसंचार ऑपरेटवर कॉल केल्यास योग्य दर लागू होणार आहेत. जीओच्या नव्या एकाच प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डाटा मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर
दूरसंचार भाड्याचा (टेलिकॉम टॅरिफ) आढावा घेण्याच्या प्रक्रियेबाबत सरकारबरोबर चर्चा करत असल्याचे जिओने म्हटले आहे. तसेच इतर भागीदारांनी (स्टेकहोल्डर्स) त्यात सहभागी होतील, अशी 'जिओ'ने अपेक्षा व्यक्त केली. व्होडाफोन आयिडया आणि भारती एअरटेलनेदेखील ३ डिसेंबरपासून मोबाईल कॉलिंग आणि डाटाचे दर ३ डिसेंबरपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.