कोलकाता - जपानने जम्मू आणि काश्मीरमध्ये गुंतवणूक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी तिथे सामान्य स्थिती असायला हवी, असे मत जपानचे राजदूत केन्जी हिरामात्सू यांनी व्यक्त केले.
...तर जम्मू आणि काश्मीरमध्ये जपान गुंतवणूक करणार - जपान
जम्मू आणि काश्मीरकडे सकारात्मक विकासाच्या दृष्टीने पाहत असल्याचे जपानचे राजदूत केन्जी हिरामात्सू यांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीरकडे सकारात्मक विकासाच्या दृष्टीने पाहत असल्याचे जपानचे राजदूत केन्जी हिरामात्सू यांनी सांगितले. जर परिस्थिती साधारण झाली तर जपान आणि जम्मू काश्मीरमध्ये व्यापारी संबंधासाठी करार करता येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. भविष्यात सकारात्मक घडेल, असेही ते म्हणाले.
द्विपक्षीय संबंधावर बोलताना त्यांनी भारतामधील जपानी कंपन्यांचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. भारतात २०१४ मध्ये १ हजार १५६ जपानी कंपन्या होत्या. हे प्रमाण वाढून २०१९ मध्ये १ हजार ४४१ एवढे झाले आहे.