कोलकाता - पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दुसऱ्यावर जबाबदारी टाकू शकत नाहीत, असे म्हटले आहे. त्यांच्याकडे जीएसटी परिषदेचे अध्यक्षपद आहे, याची त्यांनी आठवणही करून दिली. पेट्रोलियम उत्पादनांवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यावा, असे विधान सीतारामन यांनी केले होते.
पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा म्हणाले, जीएसटी परिषद ही केंद्र सरकारची संस्था आहे. अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे आहे. जर त्यांना पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या कार्यकक्षेत आणायचे असेल त्यांनी हा विषय जीएसटी परिषदेच्या विषयपटलावर आणावा. राज्यांनी पेट्रोलच्या जीएसटीवर निर्णय घ्यायचा आहे, हे त्या कसे सांगू शकतात, असे मित्रांनी विचारले.