नवी दिल्ली- परफॉर्मिंग राईट सोसायटी लि.बरोबर गुगलने संगीताच्या परवान्यासाठी करार केला आहे. यामुळे युट्युबसह गुगलच्या इतर सेवांच्या माध्यमातून वापरकर्त्याला गाणे, व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत.
युट्युबवरील संगीतासाठी गुगलचा आयपीआरएसबरोबर करार - जावेद अख्तर
परफॉर्मिंग राईट सोसायटी लि.बरोबर गुगलने संगीताच्या परवान्यासाठी करार केला आहे. यामुळे युट्युबसह गुगलच्या इतर सेवांच्या माध्यमातून वापरकर्त्याला गाणे, व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत.
आयपीआरएस ही संगीताची मालकी असणारे, संगीतकार, गीतकार आणि संगीत प्रसिद्धी करणाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था आहे. आयपीआरएस आणि गुगलमध्ये भारतामधील संगिताच्या परवान्याबाबत करार करण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे. संगीतकार, गीतकार आणि लेखक, यांना योग्य पैसे देण्याची युट्युबची बांधिलकी आहे. यामुळे गुगलने हे पाऊल उचलले आहे. वापरकर्त्याला आवडीची गाणी आणि संगीत युट्युबवर शोधता येणार असून त्याचा आनंद घेता येणार असल्याचे युट्युबचे ग्लोबर हेड ख्रिस्तोफ मुलर यांनी म्हटले आहे.
आयपीआरएसबरोबर करार केल्याने कलाकार, गीतकार तसेच संगीत चाहत्यांना चांगला अनुभव येणार आहे. आयपीआरएसचे चेअरमन जावेद अख्तर यांनी हा करार संगीतकार, गीतकार यांच्यासाठी ऐतिहासिक मैलाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. नुकताच फेसबुकनेही आघाडीच्या कंपन्यांकडून संगीताचे हक्क फेसबुकसाठी विकत घेतले आहेत.