महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गतवर्षीच्या तुलनेत औद्योगिक कर्जाच्या प्रमाणात ५.२ टक्क्यांची वाढ - औद्योगिक कर्ज

फेब्रुवारी २०१६ ला ५.४ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत पायाभूत क्षेत्राला वितरित होणाऱ्या कर्जाच्या प्रमाणात १२.६ टक्के वाढ झाली आहे.  सेंट्रम ब्रोकिंगच्या अहवालानुसार औद्योगिक कर्जाच्या वाढीचा दर हा रसायने, अभियांत्रिकी, पेट्रोलियम आणि अन्नप्रक्रिया उद्योगामुळे वाढला आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Mar 14, 2019, 5:50 PM IST

मुंबई -गतवर्षीच्या तुलनेत औद्योगिक कर्जाच्या प्रमाणात ५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही माहिती सेंट्रम ब्रोकिंगच्या अहवालातून समोर आली आहे. देशात वितरीत झालेल्या एकूण कर्जापैकी पायाभूत क्षेत्राला ३५.९ टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०१६ ला ५.४ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत पायाभूत क्षेत्राला वितरित होणाऱ्या कर्जाच्या प्रमाणात १२.६ टक्के वाढ झाली आहे. सेंट्रम ब्रोकिंगच्या अहवालानुसार औद्योगिक कर्जाच्या वाढीचा दर हा रसायने, अभियांत्रिकी, पेट्रोलियम आणि अन्नप्रक्रिया उद्योगामुळे वाढला आहे. खाणकाम उद्योगातील कर्ज वाटपाच्या वाढीचा दर हा १८.१ टक्क्याने वाढला आहे. मात्र, धातू क्षेत्राला कर्ज वाटप करण्याच्या प्रमाणात १०.३ टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाच्या वाटपात १६.९ टक्के वाढ झाली आहे. गृहउद्योगाला वाटप होणाऱ्या कर्जाच्या प्रमाणात १८.४ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत टीव्हीसारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या कर्ज वाटपात ७५ टक्के घट झाली आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details