महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' रेल्वे मार्गावर प्रवाशांना तिकिटावर मिळणार २५ टक्के सवलत - मराठी बिझनेस न्यूज

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार २५ टक्के सवलत ही केवळ वातानुकुलित आणि चेअर कार्ससाठी असणार आहे. यामध्ये शताब्दी एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस, तेजस एक्प्रेस, डबल डेकर आणि इंटरसिटी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

संग्रहित

By

Published : Aug 28, 2019, 6:59 PM IST

नवी दिल्ली - वातानुकुलित आसनांच्या तिकिटाचे दर जास्त असल्याने रेल्वेला रस्ते मार्ग आणि हवाई मार्गाशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामधून काही मार्गावरील रेल्वेतील अनेक आसने (सीट्स) रिकामी राहतात. हा तोटा भरून काढण्यासाठी काही मार्गावर रेल्वे मंत्रालय प्रवाशांना वातानुकुलित तिकिटात २५ टक्के सवलत देणार आहे.


रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार २५ टक्के सवलत ही केवळ वातानुकुलित आणि चेअर कार्ससाठी असणार आहे. यामध्ये शताब्दी एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस, तेजस एक्प्रेस, डबल डेकर आणि इंटरसिटी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. ही सवलत देण्याचे परिपत्रक झोनल व्यवस्थापकांना देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

ज्या रेल्वेमध्ये ५० टक्क्यांहून कमी आसन क्षमता भरलेली असेल अशा रेल्वेमध्ये प्रवाशांना ही सवलत दिली जाणार आहे. किती सवलत द्यायची हा निर्णय घेण्याचे अधिकार रेल्वे झोनच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांना दिले आहेत. ही सवलत किती काळासाठी देण्यात येईल हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र हे प्रवाशांच्या प्रतिसादावर अवलंबून असणार आहे. अजमेर शताब्दी ही दिल्ली ते अजमेरपर्यंत धावते या मार्गावर जयपूर ते अजमेर अनेक वातानुकुलित आसने रिकामी असतात. या मार्गावर व्हॉल्वोमधून प्रवास करण्याला अनेकजण प्राधान्य देतात.


या मार्गावर व्हॉल्वो बसपेक्षा रेल्वेच्या वातानुकुलित आसनांचा कमी असणार दर-
बंगळुरू-म्हैसूर विभातील चेन्नई-म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, जयपूर-अजमेर मार्गामधील दिल्ली-अजमेर एक्सप्रेस, कानपूर-लखनौ मार्गामधील दिल्ली-लखनौ शताब्दी एक्सप्रेस, मालडा-न्यू जलपायगुडीमधील न्यू जलपायगुडी हावडा एक्सप्रेस

रेल्वेने सर्व झोनला कमी आसनक्षमतेने धावणाऱ्या रेल्वेची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आदेश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details