सॅन फ्रान्सिस्को- गुगलच्या मालकीची कंपनी असलेल्या युट्युबची भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नुकतेच सुरू करण्यात आलेले युट्युब म्युझिक हे अॅप १.५ कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आल्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले.
भारत हे युट्युबची सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ - सुंदर पिचाई
युट्युब म्युझिक आणि युट्युब प्रिमिअम हे ४३ देशात उपलब्ध आहे. मार्चमध्ये युट्युब म्युझिकची सुरुवात करण्यात आली. युट्युबच्या जाहिरातींचा व्यवसाय हा सातत्याने वाढत असल्याचे भारतीय वंशाच्या सुंदर पिचाईंनी सांगितले.
युट्युब म्युझिक आणि युट्युब प्रिमिअम हे ४३ देशात उपलब्ध आहे. मार्चमध्ये युट्युब म्युझिकची सुरुवात करण्यात आली. युट्युबच्या जाहिरातींचा व्यवसाय हा सातत्याने वाढत असल्याचे भारतीय वंशाच्या सुंदर पिचाईंनी सांगितले. सध्या युट्युबवरील कटेन्टची स्वच्छता सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही सुरुवात कदाचित युट्युब कॉमेंटपासून करण्यात येणार आहे. पुढे ते म्हणाले, की कटेन्टच्या जबाबदारीविषयी मी बोललो होतो. आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. आम्ही उच्च दर्जाच्या कटेन्टची शिफारस करतो. तसेच हानिकारक आणि कमी दर्जाचा कटेन्ट काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
युट्य़ुबवरील अलेक्स जोन्स याच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे युट्य़ुबवर टीका होत आहे. अलेक्स जोन्सच्या पोस्टला अनेक सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. या सुधारणांची पुढील आठवड्यात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी पिचाई यांनी माहिती दिली.