महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' राज्यात वीज देयक भरता येणार हप्त्यात! - Electricity bill scheme in UP

शहरी भागातील ग्राहकांना ५ केव्हीपर्यंतचे वीज देयक ही १२ हप्त्यात भरता येणार आहेत. तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी  वीज देयक २४ हप्त्यात भरता येणार आहेत.

श्रीकांत शर्मा

By

Published : Nov 7, 2019, 8:11 PM IST

लखनौ - वीज देयक वेळेवर न भरल्याने ग्राहकांना कारवाईची भीती असते. मात्र, थकलेली वीज देयके कमी करण्यासाठी उत्तर प्रदेश उर्जा महामंडळाने ग्राहकांसाठी अनोखी योजना आणली आहे. ग्राहकांना त्यांचे वीज देयक ही हप्त्यामध्ये भरता येणार आहेत.


शहरी भागातील ग्राहकांना ५ केव्हीपर्यंतचे वीज देयक ही १२ हप्त्यात भरता येणार आहेत. तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी वीज देयक २४ हप्त्यात भरता येणार आहेत. उत्तर प्रदेशचे उर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांनी नव्या योजनेसाठी ११ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या योजनेत शहरी भागातील केवळ घरगुती ग्राहकांना सहभाग घेता येणार आहे. तर ग्रामीण भागातील सर्व ग्राहकांना योजनेत सहभागी होता येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये थकित वीज देयक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे आम्ही योजना आणली आहे. ग्राहकांना थकित वीज देयकापैकी ५ टक्के किंवा किमान १ हजार ५०० रुपये पहिला हप्ता ऑक्टोबरच्या वीज देयकाबरोबर देता येणार आहे.

जे ग्राहक वेळेवर वीज देयक भरतात, असेच ग्राहक योजनेसाठी पात्र असतील, असेही शर्मा यांनी सांगितले. ग्राहकांकडून केवळ ऑनलाईन देयक स्वीकारले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details