नवी दिल्ली - कोरोनाच्या चाचणींची संख्या वाढविण्याचे आव्हान असताना दिलासादायक बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट टॅक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीने कोरोना चाचणीचे किट विकसित केले आहे. विशेष म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आयआयटीच्या किटला मान्यता दिली आहे.
आयआयटी दिल्लीने कोरोनाची किट तयार करण्याचे काम जानेवारीच्या अखेरीला सुरुवात केले होते. कमी किमतीत जास्तीत जास्त कोरोनाची चाचणी करणारे किट तयार करण्याची इच्छा असल्याचे आयआयटीचे प्राध्यापक व्ही. पेरुमल यांनी सांगितले. या किटमध्ये स्वॅबची चाचणी घेण्यात येते. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व किटहून याची किंमत कमी असेल, अशी त्यांनी माहिती दिली.