महाराष्ट्र

maharashtra

चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने कर परताव्यापोटी दिले १.६१ लाख कोटी

By

Published : Jun 24, 2019, 4:05 PM IST

एकूण आलेल्या परताव्याच्या अर्जापैकी ०.५ टक्क्याहून अधिक अर्ज छाननीसाठी निवडण्यात आले आहे. बहुतांश प्राप्तीकर परतावे हे  वेगाने आणि कार्यक्षमतेने देण्यात आल्याचे सीतारमण यांनी यावेळी लोकसभेत सांगितले.

निर्मला सीतारमण

नवी दिल्ली - प्राप्तीकर विभागाने कर परताव्यापोटी चालू आर्थिक वर्षात १.६१ लाख कोटी वितरित केले आहेत. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत लेखी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ६.४९ कोटीहून अधिक रक्कमेच्या ईलेक्ट्रॉनिक व्यवस्थेतून परताव्यासाठी अर्ज भरले होते. छोट्या करदात्यांसह करदात्यांना परतावा देण्याचे सरकारचे प्राधान्य असल्याचे सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले. एकूण आलेल्या परताव्याच्या अर्जापैकी ०.५ टक्क्याहून अधिक अर्ज छाननीसाठी निवडण्यात आले आहे. बहुतांश प्राप्तीकर परतावे हे वेगाने आणि कार्यक्षमतेने देण्यात आल्याचे सीतारमण यांनी यावेळी लोकसभेत सांगितले.

  • तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याने प्राप्तीकर परताव्याच्या प्रक्रियेला वेळ कमी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • प्राप्तीकर परताव्याचे ६४ हजार कोटी हे १८ जूनपर्यंत वितरित करण्यात आले आहेत.
  • आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये प्राप्तीकर परताव्याचा अर्ज भरण्याची आठवण करून देण्यासाठी २६. ९ कोटी करदात्यांना ईमेल व एसएमएस पाठविण्यात आले.

केंद्र सरकारने जानेवारी २०१९ मध्ये ई-फायलिंग आणि केंद्रीय प्रक्रिया केंद्र (सीपीसी) २.० प्रकल्पाचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय मंजूर केला. यामुळे प्राप्तीकर विभागाला कर परतावा वेळेवर देणे शक्य होत असल्याचे सीतारमण यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details