महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

चीपचा अपुरा पुरवठा असल्याने ह्युदांईसह किया उत्पादन प्रकल्प बंद ठेवणार - ह्युंदाई

चीपचा पुरवठा कमी असल्याने ह्युदांई मोटर आणि सहयोगी कंपनी कियाने काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे. तर त्याचा दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीवर परिणाम होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ह्युदांई
ह्युदांई

By

Published : May 14, 2021, 8:20 PM IST

सेऊल- ह्युदांई मोटर आणि सहयोगी कंपनी कियाने काही दिवस असेम्बली लाईन बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा असल्याने या वाहन कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

ह्युंदाईचे दक्षिण कोरियामध्ये पाच उल्सान, असान आणि जेऊनजूमध्ये प्रत्येकी एक असे प्रकल्प आहेत. तर विदेशामध्ये १० प्रकल्प आहेत. यामध्ये चीनमध्ये चार, अमेरिका, झेक रिपब्लिक, तुर्की, भारत, रशिया आणि ब्राझीलमध्ये प्रत्येकी एक प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पामधून ५.५ दशलक्ष वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे. किया कंपनीने चीप शॉर्टेजमुळे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-जिओ फोनकडून धमाकेदार ऑफर; दर महिन्याला मिळणार ३०० मिनिटे मोफत कॉलिंग

कियाही थांबविणार उत्पादन-

किया कंपनीचे कोरियामध्ये ८ आणि इतर देशांमध्ये सात प्रकल्प आहेत. त्यापैकी चीनमध्ये तीन, अमेरिका, स्लोवाकिया, मेक्सिको आणि भारतामध्ये प्रत्येकी एक प्रकल्प आहे. या उत्पादन प्रकल्पांमधून ३.८४ दशलक्ष वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे. चीपचा पुरवठा कमी असल्याने दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीवर परिणाम होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-सलग दुसऱ्या वर्षी अक्षयतृतीयेला 'लॉकडाऊन'; सराफ व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे होणार नुकसान

वाहन कंपन्यांना चीपचा पुरवठा होण्यात अडथळे

कंपनीकडून दुसऱ्या तिमाहीतही उत्पादन थांबविले जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती आणि आगीच्या घटनांमुळे वाहन कंपन्यांना चीपचा पुरवठा होण्यात अडथळे आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details