नवी दिल्ली - केंद्र सरकारने २० ते २५ विमानतळ भाड्याने देण्याचे नियोजन आखले आहे. या विमानतळाचे कामकाज, व्यवस्थापन आणि विकास हे खासगी-सरकारी भागीदारीतत्वाने (पीपीपी) होणार आहे. याबाबतची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी दिली.
नव्या भाड्याने दिलेल्या विमानतळावर दरवर्षी १० लाख ते १५ लाख प्रवासी वाहतूक होईल, असे गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी सांगितले. गतवर्षी केंद्र सरकारने अहमदाबाद, जयपूर, लखनौ, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू ही विमानतळे भाड्याने देण्यासाठी मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकार २० ते २५ विमानतळे भाड्याने देणार - भारतीय विमानतळ प्राधिकरण
गतवर्षी केंद्र सरकारने अहमदाबाद, जयपूर, लखनौ, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू ही विमानतळे भाड्याने देण्यासाठी मंजुरी दिली आहे.
संग्रहित - विमानतळ
खासगी-सहकारी भागीदारीतत्वाने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोचिन येथील विमानतळाचे व्यवस्थापन केले जात आहे. दरम्यान, मोहपात्रा हे उद्योग विकास आणि अंतर्गत व्यापाराचे सचिव म्हणून १ ऑगस्टपासून जबाबदारी स्वीकारणार आहेत. उद्योगातील सूत्राच्या माहितीनुसार, पीपीपीच्या पद्धतीनुसार पायाभूत प्रकल्पात कार्यक्षमता निर्माण होते.