महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाळेबंदी : आरोग्यांसह वाहन विमा भरण्याची १५ मेपर्यंत वाढविली मुदत - लॉकडाऊन

उशीरा विमा हप्ता दिला तरी त्या दिवसापासून ग्राहकाला विम्याचा लाभ मिळू शकणार असल्याचे वित्तीय व्यवहार विभागाने अधिसूचनेत म्हटले आहे. आरोग्य विमा हप्ता भरण्यासाठीही १५ मेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

विमा
विमा

By

Published : Apr 16, 2020, 11:01 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने टाळेबंदीमुळे आरोग्य विमा आणि वाहन विमाचा हप्ता भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे विमा ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

ज्यांना तृतीय पक्षाचा वाहन विमा हप्ता २५ मार्च ते ३ मेपर्यंत भरायचा होता, त्यांना हा हप्ता १५ मे अथवा त्यापूर्वी भरता येणार आहे. २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत भरावा लागणारा वाहन विमा हप्ता हा २१ एप्रिलपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, टाळाबंदी वाढविल्यामुळे विमा हप्ता भरण्यासाठी पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा- नीती आयोगाच्या उपाध्यक्षांसह सदस्य घेणार ३० टक्के कमी वेतन

उशीरा विमा हप्ता दिला तरी त्या दिवसापासून ग्राहकाला विम्याचा लाभ मिळू शकणार असल्याचे वित्तीय व्यवहार विभागाने अधिसूचनेत म्हटले आहे. आरोग्य विमा हप्ता भरण्यासाठीही १५ मेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकाच्या आदेशानुसार ३ मेपर्यंत देशभरात टाळेबंदी असणार आहे.

हेही वाचा-नीती आयोगाच्या उपाध्यक्षांसह सदस्य घेणार ३० टक्के कमी वेतन

ABOUT THE AUTHOR

...view details