नाशिक- कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाने कांद्याच्या भावात सुधारणा होणार असल्याने मनमाडच्या शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. सरकारने निर्यातीचे शुल्क माफ करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कांदे निर्यात बंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना व व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे. निर्यात शुल्क माफ केल्याने शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळू शकेल, असे मत शेतकरी व बाजार समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. निर्यात बंदी रद्द केल्याने कांद्याच्या भावात सरासरीहून 250 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. कांदे निर्यात शुल्क माफ केल्यास अजून चांगला भाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे.