वॉशिंग्टन - इंटरनेट कंपन्यांकडून वैयक्तिक गोपनीयतेचा भंग झाल्यास अमेरिकेत मोठा आर्थिक दंड करण्याची कायदेशीर तरतूद आहे. याच कायद्याचा बडगा
युट्यूबची मालकी असलेल्या गुगलला बसणार आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापारी आयोगाने १ हजार ते १४०० कोटींचा दंड (१५० ते २०० दशलक्ष डॉलर) दंड ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.
अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापारी आयोगाने (एफटीसी) तोडगा म्हणून गुगलला १ हजार ते १४०० कोटींचा दंड निश्चित केला आहे. या दंडाला अमेरिकेच्या न्याय विभागाची मंजुरी लागणार आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर लहान मुलांच्या माहितीच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणीचा सर्वात मोठा दंड ठरणार आहे.
हा आहे गुगलवर आरोप-
गुगलने १३ वर्षापर्यंतच्या मुलांच्या माहिती घेवून गोपनयीतेचा भंग केल्याचा आरोप युट्युबविरोधात करण्यात आला आहे. जाहिराती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी लहान मुलांचा वैयक्तिक डाटा घेतल्याचे आरोपात म्हटले आहे. याबाबतचा निर्णय एफटीसीकडून सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. हानिकारक व्हिडिओपासून मुलांना दूर ठेवण्यात गुगल अपयशी ठरल्याचा एफटीसीने ठपका ठेवला आहे. याबाबत सेंटर फॉर डेमॉक्रसीने गुगलला ठोठावलेला दंड खूपच कमी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
एफटीसीने फेसबुकलाही ठोठावला आहे दंड-
गुगल ही अल्फाबेट कंपनीचे सर्च इंजिन आहे. या कंपनीचे बहुतांश उत्पन्न हे डिजिटल अॅडमधून येते. फ्रान्सच्या सीएनआयएल या नियामक संस्थेने गुगलला ५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावला होता. यावर गुगलने अपील दाखल केले आहे. नुकतेच एफटीसीने फेसबुकला वैयक्तिक माहितीचा दुरपयोग केल्याप्रकरणी ५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे.