महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याला झळाळी.. भाववाढीचा नवा उच्चांक, प्रति तोळा दर ३८, ७७० रुपये ! - jewellers buying

केवळ देशामध्ये ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे.विशेष म्हणजे ​​​​​​​जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत. विदेशातील बाजारपेठेत सोन्याची मागणी घटूनही देशातील सोन्याची मागणी वाढली आहे.

संग्रहित - सोन्याचा दर

By

Published : Aug 20, 2019, 6:38 PM IST

नवी दिल्ली - सणाच्या तोंडावर सोन्याच्या दराने आज नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर प्रति तोळा ३८,७७० रुपये झाला आहे. ज्वेलर्सकडून झालेल्या मागणीमुळे सोन्याची भाववाढ झाल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे.


केवळ देशामध्ये ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे.विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत. विदेशातील बाजारपेठेत सोन्याची मागणी घटूनही देशातील सोन्याची मागणी वाढली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढण्यास सहाय्य झाल्याचेही असोसिएशनने म्हटले आहे.

दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर २०० रुपयाने वाढून प्रति तोळा ३८,७७० रुपये झाला आहे. तर ९९.५ टक्के शुद्धतेचा सोन्याचा दर हा प्रति तोळा ३८,६०० रुपये झाला आहे. सोव्हर्जिअन सोन्याचा दर हा प्रति ८ ग्रॅमला २०० रुपयाने घसरून २८,६०० रुपये झाला आहे.

चांदीचा भाव प्रति किलो १ हजार १०० रुपयाने घसरून ४३ हजार ९०० रुपये झाला आहे. नाणेनिर्मिती आणि औद्योगिक उत्पादकाकडून मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details