नवी दिल्ली- वाहन कंपन्यांनी पर्यावरणस्नेही वाहनांची निर्मिती करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पर्यावरणस्नेही इंधनात कृषी इंधनांचा वापर करणे शक्य व्हावे, याकडे कंपन्यांनी लक्ष द्यावे, अशी गडकरींनी मागणी केली. ते टोयोटाच्या ईव्ही वाहन तंत्रज्ञानविषययक कार्यक्रमात बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, सध्या, देशाला वायू प्रदूषण या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पर्यायी, हरित आणि सुरक्षित अशा इंधनांवर लक्ष केंद्रीत करावे. पर्यावरणस्नेही इंधनाने केवळ प्रदूषण कमी होणार नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकणार आहे.