नवी दिल्ली- विदेशी गुंतवणूकदारांनी दोन दिवसात मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री केल्याने भांडवली बाजाराला मोठा फटका बसला आहे. गुंतवणणूकदारांनी २ हजार ८८१ कोटी रुपये भांडवली बाजारामधून काढून घेतले आहेत.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान २ हजार ९८५.८८ कोटी भांडवली बाजारामधून काढून घेतले आहेत. चीन-अमेरिकेमध्ये पुन्हा व्यापारी युद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे ग्रोचे सीओओ हर्ष जैन यांनी सांगितले. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करण्याची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. जानेवारीपासून विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी धडाक्यात केली होती.