नवी दिल्ली- कोरोनामुळे देशातील स्मार्टफोन, वाहन क्षेत्र, औषधी उत्पादन अशा विविध क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी भेट घेणार आहेत. कोरोनाचा व्यापार आणि उद्योगावर काय परिणाम होणार आहे, हे निर्मला सीतारामन जाणून घेणार आहेत.
कोरोनाच्या होणाऱ्या परिणामाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आकलन करून घेणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, चीनमध्ये कोरोनाचा सध्या संसर्ग सुरू आहे. त्याचा भारतीय उद्योग आणि व्यापारावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी सचिवांसह केंद्रीय अर्थमंत्री उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.
संबंधित बातमी -चीनच्या कोरोनाने भारतीय उद्योगांची 'दमछाक', पोल्ट्री व्यवसायावरही परिणाम