न्यूयॉर्क - बंदीची टांगती तलवार असलेल्या टिकटॉकला अखेर अमेरिकेतील न्यायायाधीशांनी दिलासा दिला आहे. टिकटॉकवर आज मध्यरात्रीपासून लागू होणारी बंदी पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी लागू करण्याचे आदेश काढले होते.
कोलंबियाचे अमेरिकन न्यायालयाचे न्यायाधीश कार्ल निकोलस यांनी टिकटॉकवर बंदी लागू करण्यासाठी संमती दर्शविली नाही. त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पाडल्यानंतर आठवभरानंतर नोव्हेंबरमध्ये टिकटॉकवर बंदी लागू होणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश वापरून टिकटॉकवर बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. टिकटॉकमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असून नागरिकांची माहिती गोपनीय राहत नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यावर टिकटॉकने न्यायालयात धाव घेऊन ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. टिकटॉकच्या याचिकेवर न्यायालयाने रविवारी सकाळी तातडीने सुनावणी घेण्यात आली.