महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वाहन उद्योगावरील मंदीचे सावट कायम; फेब्रुवारीत वाहन विक्रीत १९ टक्के घसरण

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) दिलेल्या आकेडवारीनुसार फेब्रुवारीत १६ लाख ४६ हजार ३३२ वाहनांची विक्री झाली. तर गतवर्षी फेब्रुवारीत देशामध्ये २० लाख ३४ हजार ५९७ वाहनांची विक्री झाली होती.

Auto Sales
वाहन विक्री

By

Published : Mar 13, 2020, 12:43 PM IST

नवी दिल्ली - देशातील वाहन विक्रीच्या व्यवसायात फेब्रुवारीमध्येही घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत १९.०८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) दिलेल्या आकेडवारीनुसार फेब्रुवारीत १६ लाख ४६ हजार ३३२ वाहनांची विक्री झाली. तर गतवर्षी फेब्रुवारीत देशामध्ये २० लाख ३४ हजार ५९७ वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-किरकोळ बाजारातील महागाईत घसरण; फेब्रुवारीत ६.५८ टक्क्यांची नोंद

जानेवारीत वाहनांची विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत १३.८३ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत चालू वर्षाच्या फेब्रुवारीत प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.६१ टक्के घसरण झाली आहे.

हेही वाचा-येस बँकेचे ७,२५० कोटींचे शेअर खरेदीला एसबीआय संचालक मंडळाची संमती

ABOUT THE AUTHOR

...view details