नवी दिल्ली -खोटी माहिती व अफवा रोखण्याच्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या फेसबुकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल नेटवर्क फेसबुकने कोरोना लस, हवामान बदल, निवडणूक आणि इतर विषयांवर चुकीची माहिती टाकल्यास नवीन नियम आजपासून लागू करणार असल्याचे म्हटले आहे.
जर सतत फेसबुक अकाउंटवरून चुकीची माहिती टाकली तर अशा अकाउंटवरील पोस्ट कमी दाखविल्या जाणार आहेत. जर खोटी माहिती असणारी पोस्ट असेल तर फॅक्ट चेकरमधील सत्यता फेसबुककडून नोटिफिकेशन दिले जाते. त्यासाठी कंपनीने फॅक्ट चेकिंग पार्टनर नेमले आहेत.
हेही वाचा-चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला
चुकीची माहिती देणाऱ्या अकाउंटला दंड
फॅक्ट चेकिंग नोटिफिकेशन समजण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जर सतत खोटी माहिती पोस्ट केली तर त्या वापरकर्त्याच्या पोस्ट या न्यूजफीडमध्ये कमी दाखविल्या जातात. फेसबुकने म्हटले, की चुकीची माहिती देणाऱ्या पेजेस, ग्रुप्स, इन्स्टाग्राम अकाउंट आणि डोमेन्सवर कठोर कारवाई केलेली आहे. आता, अशा अकाउंटवर फेसबुककडून दंड केला जाणार आहे.
हेही वाचा-'नव्या सोशल मीडियाच्या नियमाबाबत व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यांनी घाबरण्यासारखे काही नाही'
नवीन नियमांचे पालन करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न सुरू
दरम्यान, फेसबुकने फॅक्ट चेकिंग प्रोग्रॅम हा २०१६ मध्ये लाँच केला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या नवीन कायद्यातील तरतुदी 26 मे पासून लागू होणार आहेत. या तरतुदींचे पालन करण्याकरिता अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यासाठी कंपनीकडून कठोर मेहनत घेण्यात येत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.