महाराष्ट्र

maharashtra

ई-सिगरेटवर पूर्णपणे बंदी लागू करा; शेतकऱ्यांची शिखर संघटना एफएआयएफएची मागणी

By

Published : Sep 11, 2019, 4:30 PM IST

सिगरेटसाठी देशाबाहेर उत्पादन घेणाऱ्या तंबाखूमधील निकोटिनचा वापर करण्यात येतो. तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या नव्या पिढीतील ई-सिगरेटसारख्या उत्पादनांना विरोध आहे. ई-सिगरेटच्या वाढत्या वापराने त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची भीती आहे.

संग्रहित - ई सिगरेट

नवी दिल्ली - ई-सिगरेट आणि तशा उत्पादनांवर पूर्णपणे बंदी लागू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची शिखर संघटना एफएआयएफएने केली आहे. ई-सिगरटेने तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांवर भयानक परिणाम होईल, अशी भीतीही संघटनेने व्यक्त केली आहे.

द फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर असोसिएशन्सने (एफएआयएफए) आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमधील नगदी पिक उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते. सध्या सिगरेटसाठी देशाबाहेर उत्पादन घेणाऱ्या तंबाखूमधील निकोटिनचा वापर करण्यात येतो. तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचा नव्या पिढीतील ई-सिगरेटसारख्या उत्पादनांना विरोध आहे. ई-सिगरेटच्या वाढत्या वापराने त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची भीती आहे.

हेही वाचा-गोल्डमॅन सॅकच्या कार्यकारी अधिकाऱ्याला अटक.. ३८ कोटींची आफरातफर

ई-सिगरेटवर बंदी आल्यास शेतकऱ्यांचा व तंबाखू उत्पादकांचा रोजगार हिरावून घेतला जाईल, असे व्यापारी चुकीचे सरकारला मार्गदर्शन करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

हेही वाचा-'तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम'

ABOUT THE AUTHOR

...view details