नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्रालयाने चौथ्या टाळेबंदीत ई-कॉमर्स कंपन्यांना घरपोहोच बिगर जीवनावश्यक वस्तुंची डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचे ई-कॉमर्स कंपन्यांनी स्वागत केले आहे.
टाळेबंदी ४.० मध्ये आर्थिक चलनवलनाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम शिथील केले आहेत. स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील ग्राहकांना सेवा देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. देशभरातील ग्राहकांना लाखो उत्पादने पोहोचू, असेही प्रवक्त्याने सांगितले.