महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एअर इंडियाच्या विक्रीकरता इच्छुकांची बोली आमंत्रीत करण्यात येणार - EoI for Air India

हवाई वाहतूक विभागाची मुख्य जबाबदारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आहे. मात्र, निर्गुंतणुकीची जबाबदारी नसल्याचे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदिप पुरी सिंग यांनी सांगितले.

Aviation Minister
केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदिप पुरी सिंग

By

Published : Dec 31, 2019, 7:12 PM IST

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या विक्रीकरता इच्छुकांची बोली आमंत्रीत (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) करण्यात येणार असल्याचे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदिप पुरी सिंग यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

हवाई वाहतूक विभागाची मुख्य जबाबदारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आहे. मात्र, निर्गुंतणुकीची जबाबदारी नसल्याचे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदिप पुरी सिंग यांनी सांगितले. एअर इंडिया ही प्रथम दर्जाची विमानसेवा आहे. मात्र, खासगीकरण करण्याबाबत दोन वेगळे विचार नाहीत. आम्ही एखाद्या अंतिम मुदतीसाठी गुलाम नाहीत. शक्य तेवढ्या लवकर निर्गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-खूशखबर! रुपेसह यूपीआयचा वापर केल्यास 'हे' लागणार नाही शुल्क


बाजाराला प्रभावित करणारे विमान तिकिटाचे दर निश्चित करण्यात येतात. असेच जर सुरू राहिले तर काही विमान कंपन्या बंद पडू शकतात, असा त्यांनी इशारा दिला. विमान तिकिटाचे दर नियंत्रण करण्याची कोणतीही योजना नाही. अनियंत्रणाच्या निकषांतर्गत ते घडू शकते, असेही पुरी यांनी सांगितले. बाजारात समानता आणण्याची गरज आहे. केवळ बाजाराला प्रभावित करणाऱ्या किमतीमुळे विमान कंपन्या आजारी पडत नाहीत, असेही ते म्हणाले. विमान कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर बाजाराला प्रभावित करणाचे प्रमाण कमी झाले आहे. वास्तविक विमान भाडे असावे, असा आमचा विमान कंपन्यांना सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-या' स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅपची सुविधा १ जानेवारीपासून होणार बंद

ABOUT THE AUTHOR

...view details