नवी दिल्ली- बँक कर्मचारी संघटनांनी 31 जानेवारीपासून 2 दिवस देशव्यापी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. याच दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. वेतनवाढीचा पुनर्आढावा घ्यावा, अशी बँक कर्मचारी संघटनांची मागणी आहे.
सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित आहे. हा संप सरकारी बँकांच्या 9 संघटनांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँकेने (युएफबीयू) करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि नॅशनल ऑरगिनॅझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) या बँक कर्मचारी संघटनांचा समावेश आहे.
हेही वाचा-जीएमआर'चा ४९ टक्के शेअर टाटा ग्रुपच्या कंपनीला विकण्याचा निर्णय