महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीमध्ये २ दशलक्ष डॉलरची फसवणूक - एलॉन मस्क

सायबर गुन्हेगारांनी लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर केला आहे. तर मस्क यांच्यासारखे प्रोफाईल आणि अकाउंटशी साधर्म्य असलेले अकाउंट सायबर गुन्हेगारांनी तयार केले होते. क्रिप्टोकरन्सीमधून मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते.

एलॉन मस्क
एलॉन मस्क

By

Published : May 18, 2021, 3:43 PM IST

सॅन फ्रान्सिस्को- टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क असल्याचे भासवित सायबर गुन्हेगारांनी अनेकांना गंडा घातला आहे. यामधून गेल्या सहा महिन्यांत ग्राहकांनी २ दशलक्ष डॉलर क्रिप्टोकरन्सीच्या लोभापोटी गमाविले आहेत.

सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीच्या चलनातून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती फेडरल कमिशनने दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर केला आहे. तर मस्क यांच्यासारखे प्रोफाईल आणि अकाउंटशी साधर्म्य असलेले अकाउंट सायबर गुन्हेगारांनी तयार केले होते. क्रिप्टोकरन्सीमधून मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते.

हेही वाचा-भारताला धक्का; ओएनजीने शोधलेल्या इराणमधील गॅस साठ्याचे गमाविले कंत्राट

ट्विटर मॉडरेटरला गुन्हे रोखण्यात फारसे यश नाही-

सायबर गुन्हेगार हे मस्क असल्याचे भासवित पीडितांना विशिष्ट अशा वॉलेटच्या खात्यावर पैसे पाठविम्याचे आवाहन करत होते. त्याबदल्यात चांगला परतावा देऊ, अशी थापही सायबर गुन्हेगार मारत होते. ट्विटरवरून आर्थिक फसवणूक केल्याने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन होते. मात्र, ट्विटर मॉडरेटरला असे गुन्हे रोखण्यासाठी फारसे यश मिळाले नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

सरासरी ग्राहकांकडून १,९०० डॉलर गमाविले

ऑक्टोबरपासून ग्राहकांनी क्रिप्टोकरन्सीमधून ८० दशलक्ष डॉलर गमाविल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली होती. ग्राहकांनी क्रिप्टोचलनाच्या फसवणुकीतून सुमारे १,९०० डॉलर गमाविल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी क्रिप्टोकरन्सीला नेहमीच आजवर प्रोत्साहन दिले आहे. एका बिटकॉईनवर टेस्लाची कारही ग्राहकांना खरेदी करता येईल, असे त्यांनी जाहीर केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details