नवी दिल्ली- सर्वसामान्य कोरोनाच्या महामारीच्या संकटात विविध समस्यांना सामोरे जात असताना महागाईनेही त्रस्त झाला आहे. खाद्यतेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींनी गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
दैनंदिन जीवनात लागणारे खाद्यतेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा-ट्विटरकडून कोरोनाच्या संकटात दानशूरपणा; ३ एनजीओला १५ दशलक्ष डॉलरची मदत
खाद्यतेलाच्या किमती दुप्पट
- उदाहरणार्थ कोलकातामध्ये खाद्यतेलाच्या किमती दोन वर्षात जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
- मोहरीच्या तेलाची किंमत मे २०१९ मध्ये प्रति लिटर ९० रुपये होती. सध्या मोहरीच्या तेलाची किंमत प्रति लिटर १९० रुपये आहे.
- राईस ब्रानची किंमत २०१९ मध्ये ८० रुपये प्रति लिटर होती. सध्या राईस ब्रानची किंमत प्रति लिटर १५० रुपये आहे.
- शेंगदाणा तेलाची मे महिन्यात २०० रुपये प्रति लिटर किंमत आहे. तर यापूर्वी २०१९ मध्ये शेंगदाणा तेलाची किंमत १५६ रुपये प्रति लिटर किंमत होती.
- सोयाबीन तेलाची किंमत २०१९ मध्ये प्रति लिटर ९५ रुपये होती. सध्या, बाजारात सोयाबीन तेलाची किंमत प्रति लिटर १४० रुपये होती.
- सुर्यफुलाची किंमत २०१९ मध्ये प्रति लिटर १०२ रुपये होती. सध्या सुर्यफुलाची किंमत प्रति लिटर १८० रुपये होती.