नवी दिल्ली - उद्योग आणि मोठ्या संस्थांनी बालकामगार कामावर घेऊ नये, असे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आवाहन केले. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त सत्यार्थी यांनी बालकामगार समस्येबाबत ट्विट केले आहे.
आर्थिक वृद्धि व बालकामगार प्रश्न हे एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाहीत, असे कैलाश सत्यार्थी यांनी मत व्यक्त केले. बालकामगार समस्या संपल्याने प्रौढांसाठी रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे आर्थिक वृद्धि होवू शकते. ज्या ठिकाणी कामगारांचे अधिकार आणि पुरवठा साखळीचा दर्जा चांगला असतो, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित होते.