महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

प्रतीक्षा संपली! ५जीच्या प्रायोगिक चाचणीकरिता स्पेक्ट्रमचे दूरसंचार कंपन्यांना वाटप

दूरसंचार विभागाने रिलायन्ज जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलचे ५ जी चाचण्यांसाठी अर्ज मंजूर केले आहेत. या प्रायोगिक चाचण्या चिनी कंपन्यांचे तंत्रज्ञान न वापरता घेतल्या जाणार आहेत.

5G चाचणी
5G चाचणी

By

Published : May 28, 2021, 6:55 PM IST

Updated : May 28, 2021, 7:42 PM IST

नवी दिल्ली- दूरसंचार विभागाने दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांना ५ जीच्या प्रायोगिक चाचणीकरिता स्पेक्ट्रम वितरित केले आहे. दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांकडून दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबाद येथे ५जीच्या प्रायोगिक चाचणी घेणार आहेत.

दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांना ७०० मेगाहार्टज, ३.३-३.६ गिगाहार्टझ बँड आणि २४.२५-२८.५ गिगाहार्टझ बँड हे विविध ठिकाणांसाठी वितरित केल्याचे दूरसंचार कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. दूरसंचार विभागाने रिलायन्ज जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलचे ५ जी चाचण्यांसाठी अर्ज मंजूर केले आहेत. या प्रायोगिक चाचण्या चिनी कंपन्यांचे तंत्रज्ञान न वापरता घेतल्या जाणार आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील निर्बंधात ३० जूनपर्यंत वाढ

अशा घेतल्या जाणार ५जीच्या चाचण्या-

  • दूरसंचार विभागाने एरिकसन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉट या कंपन्यांसमेवत ५ जी चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.
  • रिलायन्स जिओकडून इन्फोकॉम्न या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ५ जी चाचणी घेण्यात येणार आहे.
  • ५ जीच्या चाचणीमध्ये टेलिमेडिसिन, टेलिइज्युकेशन आणि ड्रोनवर आधारित कृषी देखरेख यांच्या तंत्रज्ञानाची पाहणी केली जाणार आहे.
  • दूरसंचार कंपन्यांना ५ जीच्या विविध डिव्हाईसची नेटवर्कवर चाचणी घेता येणार आहे.
  • प्रायोगिक चाचणीचा कालावधी ६ महिन्यांचा आहे. त्यामध्ये दोन महिन्यांचा कालावधी हा ५ जीसाठी लागणाऱ्या यंत्रणेची खरेदी करण्यासह सुसज्जता करण्याचा समावेश आहे.
  • पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीला ५ जी चाचणी घेण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-ई-कॉमर्स क्षेत्रात टाटा ग्रुपचे महत्त्वाचे पाऊल! बिगबास्केटमध्ये घेतला मोठा हिस्सा

दरम्यान, दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार ५ जी तंत्रज्ञान हे ४ जीच्या गतीपेक्षा दहापटीने वेगाने डाऊनलोड होते. तसेच ५ जीची स्पेक्ट्रम क्षमता ही ४जीच्या तुलनेत तीनपटीने जास्त आहे.

Last Updated : May 28, 2021, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details